Latest Marathi News Live Update : गोकुळच्या मतमोजणीला सुरुवात; करवीर, भुदरगड, गगनबावड्यात क्रॉस व्होटिंग? आमदार सतेज पाटलांची रणनीती महायुतीला फोडणार घाम

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात मासे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात मासे वाहतूक करणाऱ्या ट्रकचा सकाळी अपघात झाला. हा ट्रक मच्छी घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहतूक करण्यात येणाऱ्या मालाचे नुकसान झाले आहे. अंजणारी घाटात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घाटातील काही ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्रे अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने ते रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com