Mahua Moitra on Rahul Gandhi Nightclub Video Sakal
देश

महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करा; संसदेच्या नैतिकता समितीचा 500 पानांचा रिपोर्ट समोर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात गिफ्ट घेतल्याप्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. संसदेच्या नैतिकता समितीने पाचशे पानांचा रिपोर्ट सादर केला असून त्यात मोईत्रा यांची खासदारची रद्द करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

नैतिकता समितीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, महुत्रा मोईत्रा यांची कृती आक्षेपार्ह, अनैतिक, गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे यामध्ये गंभीर शिक्षा होणे आवश्यक आहे. यासर्व प्रकरणी त्यांच्यावर निर्धारित वेळेत आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

महुआ मोईत्रा यांनी आपला संसदेतील यूझर आयडी एका दुसऱ्या व्यक्तीला दिला. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि काही गिफ्ट घेतले. हे गंभीर वर्तन आहे. हिरानंदांनी आणि महुआ यांच्यामध्ये पैशांची झालेली देवाणघेवाण याची टाईम बाऊंड चौकशी करण्यात यावी, असं नैतिकता समितीने म्हटलं आहे.

नैतिकता समितीचा रिपोर्ट लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला यांच्यासमोर हिवाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात येईल. यावर चर्चा झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. गुरुवारी मोईत्रा नैतिकता समितीच्या समोर हजर होण्याची शक्यता आहे. यासर्व प्रकरणामुळे त्या अचडणीत आल्या आहेत. त्यांची खासदारची जाण्याची दाट शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT