Expelled BJP leader Usman Ghani viral video arrested later marathi political News  
देश

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

राजस्थान पोलीसांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे नेते उस्मान गनी यांना अटक केली आहे

रोहित कणसे

राजस्थान पोलीसांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे नेते उस्मान गनी यांना अटक केली आहे. गनी यांची काही दिवसांपूर्वी पक्षातून हकालपट्टी करणयात आली होती. बिकनेरच्या पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ धातल्याचा तसेच शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नंतर त्यांना उपविभागीय मॅजिस्ट्रेटच्या समोर सादर करण्यात आले.

एका तक्रारीसंबंधी ते शनिवारी बिकानेर शहरातील मुक्ता प्रसाद नगर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि कथितरित्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. पोलीसांनी सांगितले की गनी यांच्यावर सीआरपीसीचे कलम १५१ अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर देखील ते मागे हटले नाहीत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पक्षातून हकालपट्टी का झाली?

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्याचे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष उस्मान गनी यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल स्टेटमेंट दिलं होतं. मतदान करुन आल्यानंतर एका चॅनेलशी संवाद साधताना त्यांनी मुस्लिमांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांवर भाष्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांवर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या गनी यांना भाजपने प्रतिमा खराब केल्याच्या आरोपाखाली पक्षाच्या पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले आहे.

उस्मान गनी म्हणाले होते की, राजस्थानमध्ये तीन ते चार जागांवर भाजपचा पराभव होईल.. जे सत्य आहे ते सत्य आहे. मी कधीच सत्य नाकारत नाही. मुस्लिमांबद्दल मोदींनी केलेलं विधान मला आवडलेलं नाही. त्यामुळे मी त्यांना मेल करुन याबाबत विचारणा करणार आहे. कारण मुस्लिम लोक आम्हाला जाब विचारतात.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाचा सगळ्यात मोठा चेहरा आहेत. त्यांचं विधान मला आवडलं नाही. आम्हाला लोक विचारतात तेव्हा आम्ही काय उत्तरं द्यायची? मी अल्पसंख्याक सेलचा जिल्हाध्यक्ष आहे, जसा पक्षासाठी संघर्ष करतो तसा थेट बोलतो. भाजपचं काम चांगलं आहे परंतु निवडणुका आल्या की चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जातं'' असं उस्मान गनी बोलले होते. उस्मान गनी यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT