हज यात्रेला जाणारे भाविक
हज यात्रेला जाणारे भाविक esakal
देश

हज यात्रेस या वर्षी ‘कहीं खुशी कहीं गम’ असल्याचे चित्र

- युनूस शेख

जुने नाशिक : तब्बल दोन वर्षांनंतर यंदा हज यात्रा होणार असल्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी यात्रेसाठी लागणाऱ्या खर्चात मात्र दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे हज यात्रेस घेऊन या वर्षी ‘कहीं खुशी कहीं गम’ असे चित्र आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे हज यात्रा होऊ शकली नाही. हज यात्रा करण्याची प्रत्येक मुस्लिम बांधवाची इच्छा असते. दर वर्षी देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख मुस्लिम भाविक हज यात्रेस जातात. या वर्षी परिस्थिती सामान्य असल्याने सौदी सरकारने यात्रेवरील बंदी उठवली असून, जगभरातून कोटीच्या संख्येने भाविक यात्रेस जाणार आहेत. मात्र, यात्रेस होणारी गर्दी लक्षात घेता, सर्व देशांचा यात्रेकरूंचा कोटा कमी करण्यात आला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे.

दर वर्षी देशासाठी दीड ते पावणेदोन लाख भाविकांचा कोटा होता. या वर्षी त्यात घट करून केवळ ८९ हजारांचा कोटा मिळाला आहे. त्यामुळे सहाजिकच विविध जिल्हे, शहरांचा कोटा कमी झाला आहे. राज्यासाठी सुमारे चार हजार ६३२ भाविकांचा कोटा मिळाला आहे. त्यात जिल्ह्यातील ४००, तर शहरातून सुमारे सव्वाशे ते दीडशे भाविक यात्रेस जाणार आहेत.

आतापर्यंत एका भाविकास सुमारे दोन लाख २० हजारांचा खर्च येत होता. वाढती महागाई आणि भाविकांची घटलेली संख्या लक्षात घेता, खर्चात वाढ झाली आहे. या वर्षी तीन लाख ९८ हजार रुपये खर्च येणार आहे. अर्थातच आकडेवारी लक्षात घेतली, तर खर्चात दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. चंद्रदर्शनानुसार ८ किंवा ९ जुलैला यात्रा होणार असून, १७ जूनला भाविकांचे पहिले विमान उडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यात्रेसाठी कमिटीतर्फे बॅग देण्यात येणार आहे. यापूर्वी भाविकांना खरेदी करावी लागत होती, असेही आयोजकांनी सांगितले.

७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक

हज यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सौदी सरकारने ७२ तासांपूर्वीचा कोरोना (आरटीपीसीआर) चाचणीचा अवाहल अनिवार्य केला आहे. तो अहवाल असला, तरच यात्रेस जाण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती नईम शब्बीर मुल्ला, हाजी अब्बास खान, मोबीन खतीब यांनी दिली.

९ तारखेस ट्रेनिंग कॅम्प

हज यात्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी साईनाथनगरमधील साई अक्षदा मंगल कार्यालयात हज ट्रेनिंग कॅम्प होणार आहे. त्यात यात्रेत कशा पद्धतीने धार्मिक विधी करायचा, तेथील आचरण, पेहराव आदींची माहिती देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT