देश

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ९ जणांचा मृत्यू, ५ जखमी

Sandip Kapde

पश्चिम बंगालमध्ये मोठा स्फोट झाला आहे. पूर्वीकेडील मेदिनीपूरमधील एग्रा येथील खाडीकूल गावात हा स्फोट झाला. यामध्ये ९ ठार, ५ जखमी असल्याची माहिती मिळत आहे. फटाक्याच्या कारखाण्यात हा स्फोट झाल्याची प्राथमीक माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बेकायदेशीर फटाका कारखान्याच्या मालकाला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, त्यांनी छुप्या पद्धतीने फटाके बनविण्याचे अवैध धंदे सुरू ठेवले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांतो मुझुमदार यांनी या स्फोटाची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील या स्फोटाची दखल घेतली. एग्रा येथे एक घटना घडली, ती ओडिशा सीमेजवळ आहे. आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्याला जामीन मिळाला त्यानंतर त्यावे पुन्हा अवैध धंदे सुरू केले. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आहे. मालक ओडिशामध्ये पळून गेला आहे. सीआयडीला चौकशीचे आदेश दिले आहेत. हा बेकायदेशीर कारखाना होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT