

Hardik Pandya vs Krunal Pandya
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन माजी चॅम्पियन संघांमध्ये रोमांचक सामना झाला. या सामन्यात बंगळुरूने १८ धावांनी विजय मिळवत हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली.
या सामन्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या (Hardik Pandya & Krunal Pandya) हे भाऊही आमने-सामने होते. मात्र यावेळी त्यांच्यातील बाँडिंगची नाही, तर वादाची (Rift) चर्चा या सामन्यानंतर होत आहे.