देश

विवाहबाह्य संबंध अनैतिक, मात्र त्यामुळे नोकरीवरून काढता येणार नाही : HC

बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या याचिकेवर न्यायालयात झाली सुनावणी.

सुधीर काकडे

विवाहबाह्य संबंध हे समाजाच्या दृष्टीनं अनैतिक कृत्य मानलं जाऊ शकतं, मात्र नियमांनुसार त्याला गैरवर्तन म्हणता येणार नाही अशी टिपण्णी गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकारणावर सुनावणी करताना केली. विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून नोकरीतून काढून टाकण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने (Police) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निका दिला केली. विवाहबाह्य संबंधांमुळे (Extra-Mrital Affair) नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचे आदेश न्यायालयाने यावेळी केले.

गुजरात उच्च न्यायालयाने (Gujrat High Court) या प्रकरणावर सुनावणी केली आणि याचिकाकर्त्याच्या बाजून निकाल दिला. नोकरीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्याची बडतर्फीची कारवाई रद्द करून संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावं असे आदेश जिल्हा पोलिसा आयुक्तालयाला दिले. गुजरातच्या शाहीबागमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे आपल्याच घराच्या परिसरात राहणाऱ्या एका विधवा महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. ज्यावेळी विधवा महिलेच्या कुटुंबाला संशय आला, त्यावेळी त्यांनी घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

काही दिवसांनी कॅमेऱ्यातून हे समोर आलं की, विधवा महिला आणि पोलीस हवालदाराचे संबंध आहेत. हेच पुरावे घेऊन महिलेच्या कुटुंबाने २०१२ मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, दोघांनीही आपल्यात संबंध असल्याचं मान्य केलं. महिलेनेही हे संबंध आपल्या सहमतीने असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस खात्यानं ही गोष्ट पोलिसांच्या प्रितमेला डाग लावणारी असल्याचं म्हटलं. महिलांचं आणि मुलांचं संरक्षण करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. अशा गोष्टींमुळे पोलिसांवरचा विश्वास कमी होईल असं सांगत सदरील पोलीस कर्मचाऱ्याला नोकरीतून काढून टाकलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT