india china border 
देश

लडाखमध्ये भीषण थंडी; चिनी सैनिक गारठले, भारतीय जवानांचा खडा पहारा!

पूर्व लडाखमधील पँगॉंग तलाव परिसरात सध्या हाडं गोठवणारी थंडी पडली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील (eastern ladakh) पँगॉंग तलावाच्या (Pangong Lake) परिसरात सध्या हाडं गोठवणारी भीषण थंडी पडली असून इथे सध्या उणे २ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिक अद्यापही खडा पहारा देत आहेत. मात्र, चिनी सैनिकांची हवा निघाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळं त्यांना माघार घ्यावी लागली असून पिपल्स लिबरेशन आर्मीच्या (Pipuls liberatio army) ९० टक्के सैनिकांनी हे क्षेत्र सोडून परतावं लागलं आहे. त्यांच्या जागी बदली जवान तैनात करण्यात आले आहेत. (Extreme cold in eastern Ladakh Chinese soldiers get frozen Indian soldiers stand guard)

एएनआयच्या वृत्तानुसार, चीनने गेल्या वर्षभरापासून पँगाँग तलाव परिसरात तैनात केलेल्या आपल्या सैनिकांना माघारी बोलावलं असून त्यांच्या जागी नव्या सैनिकांना तैनात केलं आहे. या भागात सध्या उणे तापमान असल्यानं पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळं ९० टक्के सैनिकांच्या बदली सैनिक तैनात करण्यात आले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, कडाक्याच्या थंडीमुळं चिनी सैनिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. इतकी कडाक्याची थंडी ते सहन करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. पँगाँगच्या फ्रिक्शन पॉईंट भागातही चीनी सैनिकांना उंच ठिकाणच्या चौक्यांवर दररोज आदलाबदली केली जात आहे.

भारतीय जवानांना उंच भागात दोन वर्षांसाठी दिली जाते नियुक्ती

भारतीय लष्कराकडून उंचावरील ठिकाणांवर जवानांची सुमारे दोन वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. प्रत्येक वर्षी भारतीय लष्कराकडून सुमारे ४०-५० टक्के जवानांना उंचावरील भागात पाठवलं जातं. या परिस्थितीत आयटीबीपीच्या जवानांचा कार्यकाळ कधी कधी दोन वर्षांहून अधिक काळही असतो.

गेल्यावर्षी दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भिडले होते

पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी उफाळून आलेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ४५ वर्षांमध्ये पहिल्यांदात भारत-चीनच्या जवानांमध्ये मोठी जीवघेणी झटापट झाली होती. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनच्या ४५ सैनिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर बराच काळ दोन्ही देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकांनंतर या भागातील तणाव निवळण्यास मदत झाली होती. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये ११ टप्प्यातील चर्चा झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT