Supreme Court Against Modi Government  
देश

Modi Govt: इतर राज्यांसाठी कडक धोरण अन् भाजपशासित राज्यात नाही, असं का?; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला झापलं!

नागालँडमधील महिला आरक्षणावरुन केंद्राची काढली खरडपट्टी

Amit Ujagare (अमित उजागरे)

New Delhi News : देशातील बिगर भाजपशासित राज्यांसाठी कडक धोरण आणि भाजपशासित राज्यांवर कारवाई नाही, असा का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्रातील मोदी सरकारला विचारला आहे. नागालँडमधील महिला आरक्षणावरुन कोर्टानं सरकारला झापलं आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Extreme stands for other states none for yours Supreme Court blasts Centre)

"तुमच्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात तुम्ही कारवाई का करत नाही? ज्या राज्याचं सरकार तुमच्या म्हणण्याप्रमाणं काम करत नाही त्यांच्यासाठी कडक धोरण आणि जिथं तुमच्या पक्षाची सत्ता आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही, असं का?," असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्राला केला आहे. (Latest Marathi News)

नागालँड सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला (SEC) 33 टक्के आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. पण या आदेशाचं पालन न केल्याचा आरोप करणारी एक अवमान याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे, या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. (Marathi Tajya Batmya)

"आरक्षण ही सकारात्मक कृतीची संकल्पना आहे, महिला आरक्षण त्यावर आधारित आहे. तुम्ही घटनात्मक तरतुदीतून बाहेर कसे काय पडता? मला हे समजत नाही," अशा शब्दांत न्या. एस. के. कौल यांनी केंद्र सरकारला झापलं आहे.

नागालँड हे एक असे राज्य आहे जिथं महिलांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थिती सर्वोत्कृष्ट आहे. तरीदेखील महिलांसाठी इथं आरक्षण का लागू केलं जात नाही," असंही पुढे न्यायमूर्तींनी नमूद केलं. यावेळी कोर्टानं भाजपशासित मणिपूरमधील हिंसाचाराचाही उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT