fact checkers mohammed zubair pratik sinha among favourites contenders for nobel peace time report  
देश

Nobel Peace Prize 2022: फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर-प्रतीक सिन्हा शर्यतीत

सकाळ डिजिटल टीम

Nobel Peace Award 2022: जगभरात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या पारितोषिकांपैकी एक असलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान भारतीय फॅक्ट-चेकर्स मोहम्मद जुबैर आणि प्रतीक सिन्हा हे यावर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक जिंकण्याच्या दावेदारांपैकी असल्याची माहिती समोर येत आहे. टाईमच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रॉयटर्स पोलमध्ये दावेदारांमध्ये जुबैर आणि प्रतीक यांची नावे आहेत. यंदाचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे जाहीर करण्यात येणार आहे.

मोहम्मद जुबैर आणि प्रतीक सिन्हा हे ऑल्ट न्यूज (Alt News) नावाची वेबसाइट चालवतात, ज्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कथित बनावट बातम्यांची सत्यता तपासली (Fact Check) जाते. टाईम मॅगझिनच्या मते, ऑल्ट न्यूज या फॅक्ट चेक वेबसाइटचे सह-संस्थापक, प्रतीक आणि जुबैर हे नॉर्वेजियन संसद सदस्यांद्वारे सार्वजनिक केलेल्या नामांकनांच्या आधारावर पारितोषिक जिंकण्यांच्या दावेदारांपैकी आहेत.

शांतता पुरस्काराच्या शर्यतीत 343 उमेदवार

2022 च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत सुमारे 343 उमेदवार आहेत, त्यापैकी 251 व्यक्ती आणि 92 संस्था आहेत. मात्र, नोबेल समिती नॉमिनेटेड लोकांची नावे जाहीर करत नाही. तसेच ही माहिती माध्यमांना आणि उमेदवारांनाही दिली जात नाही. बेलारूसचे विरोधी पक्षनेते स्वयतलाना सिचानोव्स्काया, ब्रॉडकास्टर डेव्हिड अॅटनबरो, क्लायमॅट अॅक्टिवीस्ट ग्रेटा थनबर्ग, पोप फ्रान्सिस, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे आणि म्यानमारचे राष्ट्रीय एकता सरकार हे नॉर्वेजियन खासदारांनी रॉयटर्सच्या सर्वेत नॉमिनेट केलेल्यांमध्ये आहेत.

2022 नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांची घोषणा ओस्लो येथे 7 ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता केली जाईल.


मोहम्मद जुबैर

2018 मध्ये केलेल्या ट्विटसाठी या वर्षी जूनमध्ये मोहम्मद जुबैरला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याचा आणि धार्मिक भावना दुखावण्याचे काम केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी एका सोशल मीडिया यूजरने एफआयआर दाखल केला होता. अटकेनंतर जवळपास महिनाभर तुरुंगात घालवल्यानंतर झुबेरला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला. दरम्यान त्याच्या अटकेनंतर सोशल मिडीयामध्ये जुबैरच्या समर्थनात अनेकजण पुढे आले होते. जुबैरच्या अटकेचे पडसाद जगभर उमटले होते, भारतात जुबैरला अनेक संघटनांनी विरोध केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT