fact fheck did nasa share satellite image of india from 9 pm diya event on april 5?
fact fheck did nasa share satellite image of india from 9 pm diya event on april 5? 
देश

तुमच्या मोबाईलवर ही छायाचित्रे आलेत ना? मग वाचाच...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) जनतेला 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावत एकतेचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. या घटनेनंतर अनेकांच्या मोबाईलवर छायाचित्रे व्हायरल होताना दिसत आहेत. पण, ही छायाचित्रे नेमकी कधीची आहेत, हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

मोबाईलवरून अनेकजण छायाचित्रे व्हायरल करताना दिसतात. शिवाय, नासाने सॅटेलाईटमधून ही छायाचित्रे काढल्याचा दावाही केला जात आहे. पण, या छायाचित्रांबद्दलची माहिती जाणून घ्या.नासाने रविवारच्या (ता. 5) उपक्रमानंतर कोणताही छायाचित्रे प्रसिद्ध केलेली नाहीत. सध्या व्हायरल होत असलेली छायाचित्रे ही जुनी आहेत. यातील अनेक छायाचित्रे ही देशातील दिवाळीची छायाचित्रे म्हणून यापूर्वी व्हायरल झाली आहेत.

अनेक वर्षांपासून नासाच्या नावाने हे फोटोज व्हायरल होत असल्याने नासाने यावर यापूर्वीच स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, 'दिवाळीच्या वेळी तयार होणारा कोणताही अतिरिक्त प्रकाश (उदा. दिवे, फटाके) इतका सूक्ष्म असतो की, तो अवकाशातून दिसू शकत नाही. त्यामुळे असे छायाचित्र घेणे शक्य नाही.'

१२ नोव्हेंबर २०१५ मध्ये नासाने एक छायाचित्र ट्विट करून ते फेक असल्याचे म्हटले आहे.

दिवाळीचा खरा फोटो

२०१२ साली नोव्हेंबर महिन्यात दिवाळी होती. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी Soumi NPP या सॅटेलाईटवरील Visible Infrared Imaging Radiometer Suite (VIIRS) या सिस्टिमने अवकाशातून दक्षिण आशियातील भागांचा फोटो घेतला. या सिस्टमच्या 'डे-नाईट बँड'च्या आधारावर डेटा गोळा करण्यात आला. त्यानुसार इमेज तयार झाली. त्यानंतर शहरे ओळखू येण्यासाठी त्या फोटोला उजळवले गेले.

हा तो फोटो : दिवाळीचा खरा फोटो या लिंकवर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. https://earthobservatory.nasa.gov/images/79682/south-asian-night-lights

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रविवारी देशभरात दिवे लावण्यात आले होते. मात्र, नासा किंवा इतर कोणत्या अंतराळ संस्थेने याबाबतचे अधिकृत फोटो प्रसिद्ध केलेले नाही. नासाच्या नावाने जे फोटो व्हायरल होत आहेत ते जुने आणि पूर्णपणे खोटे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT