Jyotiraditya Scindia Eknath Shinde esakal
देश

फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल : ज्योतिरादित्य सिंधिया

'एकनाथ शिंदे मराठा असल्यानं एका विचारसरणीच्या बाजूनं योग्य निर्णय घेतलाय'

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय.

महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Sambhaji Shinde) यांनी गुरुवारी सायंकाळी राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या या युतीवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलंय. सिंधिया यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती अपवित्र असल्याचंही म्हटलंय. एएनआयच्या वृत्तानुसार सिंधिया पुढं म्हणाले, 'गेल्या 2.5 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासात अपवित्र आघाडीमुळं (महाविकास आघाडी) अडथळे येत आहेत. एकनाथ शिंदे मराठा असल्यानं एका विचारसरणीच्या बाजूनं योग्य निर्णय घेतलाय. मला खात्री आहे की, फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल.'

सिंधिया यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार पाडून भाजपला सरकार (BJP Government) बनवण्यातही मदत केली होती. ते स्वत: राज्य मंत्रिमंडळाचा भाग बनले नसले, तरी त्यांना केंद्रात मोठं मंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आलीय.

एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेलं बंड काल एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर येऊन थांबलेलं असताना आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठी कारवाई केलीय. शिंदे यांची शिवसेनेतील पदांवरून हकालपट्टी केलीय. याबाबतचं पत्र व्हायरल झालंय. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेनं शिवसेनेचं सदस्यत्वही सोडलं आहे. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडं असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेते पदावरून काढून टाकत आहे, असं पत्र उद्धव ठाकरेंनी प्रसिद्ध केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT