फडणवीस  sakal
देश

साखर उद्योगाबाबत फडणवीस आज अमित शहा यांच्याशी चर्चा करणार

आज दुपारी चार वाजता शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या साखर उद्योगाबाबत देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज दुपारी चार वाजता शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी कृषीमंत्री राधाकृष्ण पाटील, हर्षवर्धन पाटील हेही बैठकीस उपस्थित राहणार आहेत. गेल्या 19 ऑक्टोबर रोजी देखील या शिष्टमंडळाने शहा यांची बैठक घैतली होती.

राज्यातील साखर कारखान्यांना आलेल्सा प्राप्तीकर विभागाच्या नोटिसा आणि अन्य मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली होती. त्यावर कोणत्याही साखर कारखान्यावर कारवाई केली जाणार नाही, असा दिलासा शहा यांनी दिला होता.

कारखान्याच्या कर्जाची फेररचना, इथेनॉल प्रकल्प यासंबंधीच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर साखर उद्योगांसमोरील सर्वच अडचणी घेऊन या शिष्टमंडळाला 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीत बोलावले होते. परंतु काल अमित शहा यांच्या कार्यबाहुल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. फडणवीस हेही काल दिल्लीत नव्हते. त्यामुळे शहा यांच्याबरोबर आज ही बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT