Court Order  esakal
देश

नवऱ्याच्या कुटुंबियांवर हुंड्याचे खोटे आरोप करणं क्रूरता, त्याला माफी नकोच; HCचं निरीक्षण

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - पती किंवा त्याच्या कुटुंबियांवर हुंड्यासाठी छळ किंवा बलात्काराचे खोटे आरोप करणे हे क्रूरता आहे. जर कोणी असे केले तर त्याला माफी नसावी, असं निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं. पती-पत्नीमधील वादावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले.

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत हे निरीक्षण नोंदवले. कौटुंबिक न्यायालयाने आपल्या आदेशात हिंदू विवाह कायदा १९५५ च्या कलम १३ (१) (आयए) अन्वये पतीला क्रूरतेच्या कारणास्तव पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार मान्य केला होता.

२०१२ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. २०१४ पासून दोघे वेगळे राहत असल्याचं सांगत कोर्टाने पत्नीचे अपील फेटाळून लावले. ९ वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण सुरू झाले होते. याच प्रकरणात पत्नीने पतीच्या भावावर बलात्काराचा आरोप केला होता, ज्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT