Adam Bidapa esakal
देश

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी फॅशन डिझायनरच्या मुलाला अटक

सकाळ डिजिटल टीम

'एका व्हीआयपीच्या मुलानं इतकी खालची पातळी गाठली, यावर माझा विश्वास बसत नाहीय.'

बंगळुरु (कर्नाटक) : प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रसाद बिडप्पा (Fashion designer Prasad Bidapa) यांचा मुलगा अॅडम बिडप्पा (Adam Bidapa) याला कन्नड चित्रपट अभिनेत्रीला (Kannada Film Actress) अश्लील संदेश (Message) पाठवल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आलीय. अॅडम बिडप्पा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणाऱ्या अभिनेत्रीनं म्हटलंय की, अॅडमचे मेसेज पाहून मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. एका व्हीआयपीच्या (VIP) मुलानं इतकी खालची पातळी गाठली, यावर माझा विश्वास बसत नाहीय. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता अॅडमनं मला अश्लील मेसेज पाठवले, त्यावेळी तो पूर्णपणे नशेत होता. त्याचे मेसेज अपमानास्पद, द्वेषपूर्ण आणि खूप दुखावणारे होते. यामुळं गेल्या आठवडाभरात मला खूप मानसिक त्रास झालाय, असं तिनं नमूद केलंय.

अभिनेत्रीनं मीडियाला पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय की, मी सात महिन्यांची गर्भवती आहे. नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून मला स्वत:ला दूर ठेवायचाय. अभिनेत्रीनं गुरुवारी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अॅडमच्या वडिलांबद्दल (प्रसाद बिडप्पा) खूप आदर असल्याचंही अभिनेत्रीनं म्हंटलंय.

अभिनेत्रीनं सांगितलं की, पूर्वी अॅडमनं दारूच्या नशेत इतर लोकांचा असाच छळ केला होता, असं त्याच्या आईनं मला सांगितलंय. मला त्याच्या आई-वडिलांचं खूप वाईट वाटतंय; पण मी असहाय्य आहे. मला स्वतःचं रक्षण करावं लागेल. माझी किंवा माझ्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्या कोणालाही मी सोडणार नाही, असंही तिनं शेवटी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT