Anuradha Paudwal Bollywood Singer 
देश

Anuradha Paudwal joins BJP: सुप्रसिद्ध 'आवाज' आता भाजपसोबत; अनुराधा पौडवाल यांनी घेतलं कमळ हाती

Anuradha Paudwal Bollywood Singer: प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दुपारी त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दुपारी त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची वाट धरली आहे. (Famous singer Anuradha Paudwal joins the Bharatiya Janata Party in Delhi)

केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्याआधी अनुराधा पौडवाल यांचा भाजपप्रवेश झाला आहे. पौडवाल भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतील का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. पौडवाल या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांची गाणे आजही लोकांचा पसंतीस पडतात. त्यांची काही भक्तीगीते खूप लोकप्रिय आहेत..

कोण आहेत अनुराधा पौडवाल?

६९ वर्षीय अनुराधा पौडवाल या ९० दशकातील आपल्या भक्तीगीतांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे लग्न १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्यासोबत झालं होतं. ते एसडी बर्मन यांचे असिस्टंट आणि म्यूझिक कंम्पोझर होते. त्यांना आदित्य नावाचा मुलगा आणि कविता नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालाय. १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. अनुराधा पौडवाल यांनी विविध भाषांमध्ये गीत गायलं आहे. भाजपसोबत त्या राजकीय कारकीर्द सुरु करु पाहात आहेत.

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, 'अद्याप मला काही माहिती नाही. पक्ष जसं सांगेल तसं मी करणार आहे.' भाजपमध्ये येणे मी भाग्य समजते, असंही त्या म्हणाल्या.

लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवल्या आहेत. त्याआधी भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनुराधा पौडवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व भाजपसोबत आलं आहे. पण, भाजप त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का? किंवा पुढे त्यांना संधी देण्यार हे पाहावं लागणार आहे. तुर्तास यावर सस्पेंस कायम आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT