देश

दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या मध्ये; शेतकऱ्याने केली अजब युक्ती

शेतकरी त्याचे दोन मजली घर सध्याच्या ठिकाणापासून ५०० फूट दूर हलवत आहे

सकाळ डिजिटल टीम

एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी पंजाबचा एक शेतकरी त्याचे दोन मजली घर सध्याच्या ठिकाणापासून ५०० फूट दूर हलवत आहे. दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गात संगरूरमधील रोशनवला गावात त्याच्या शेतात बांधलेल घर मध्ये आल्यानंतर सुखविंदर सिंग सुखी हा शेतकरी आपले घर हलवत आहे.

सुखी यांना पंजाब सरकारने घर पाडून टाकण्यासाठी नुकसान भरपाईची ऑफर दिली होती परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घर पाडण्याऐवजी दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला.

महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आले तेव्हा पंजाब सरकारने सुखी यांना घराबद्दल नुकसानभरपाई देऊ केली होती. तथापि, भरपाई घेऊन पुन्हा नवे घर बांधण्याऐवजी सुखी यांनी आहे ते घरच रस्त्याच्या जागेवरून बाजूला सरकवून घेण्याचा निर्णय घेतला. महामार्गाला वाट मोकळी करून देण्यासाठी सुखी यांना आपले घर मूळ जागेवरून ५०० फूट अंतरावर सरकवून घ्यावे लागणार आहे.

"दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गात येत असल्याने मी ते घर स्थलांतरित करत आहे. मला भरपाईची ऑफर देण्यात आली होती, परंतु मला दुसरे घर बांधायचे नव्हते. ते बांधण्यासाठी मी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. आत्ता ते 250 फूट पुढे सरकले आहे,” अशी माहिती सुखविंदर सिंग सुखी यांनी एएनआयला बोलताना दिली आहे.

प्रवाशांचा प्रवास वेळ कमी करण्याच्या उद्देशाने केंद्राच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत एक्सप्रेस वे बांधला जात आहे. पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वे हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT