farmer_20protest 
देश

Farmer Protest : शेतकरी दिनादिवशीच अन्नदाता राहणार उपाशी!

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला रोध कायम आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे, तर केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करण्याची तयारी दाखवलीये, पण कायदे रद्द न करण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ आज कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना भेटले. पण, चर्चेनंतरही तोडगा निघू शकलेला नाही. 

भारतविरोधी भूमिका ओलींना भोवली! नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका जाहीर

शेतकरी दिवस 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना या दिवशी जेवण न करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत कृषी कायदे वापस घेतले जात नाहीत, MSPसाठी कायदा आणला जात नाही, तोपर्यंत शेतकरी येथून जाणार नाही. 23 तारखेला शेतकरी दिनाच्या पार्श्वभूमीवर एका वेळचे जेवण करु नका आणि शेतकरी आंदोलनाची आठवण ठेवा, असं ते म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांनी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत हरियाणामध्ये टोल प्लाजा मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असं भारतीय किसान यूनियनचे जगजीत सिंह दलेवाला  म्हणाले. स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव म्हणाले की, कृषी कायद्याविरोधात निदर्शने होणाऱ्या सर्व ठिकाणी सोमवारी एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात येईल.

नवीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनात जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी रविवारी 'श्रद्धांजली दिवस' पाळला. यादरम्यान शेतकऱ्यांकडून प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 24 दिवसांपासून हरियाणा-दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी आपल्या निश्चयापासून अजिबातच ढळलेले नाहीयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT