nuthalapati venkata ramana file photo
देश

शेतकऱ्याचा मुलगा ते सरन्यायाधीश; न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- न्या. नुथालापती व्यंकट रमणा हे मागील चार दशकांपासून कायदा आणि न्यायव्यवस्थेचा भाग आहेत. दोन उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय, विविध प्रशासकीय लवाद, विविध सरकारी संघटनांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. राज्यघटना, गुन्हेगारी, सेवा आणि आंतरराज्य नदी कायदे आदींवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. एनव्ही रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम हे त्यांचे मूळ गाव. पूर्ण वेळ वकिली करण्यापूर्वी रमणा यांनी काही काळ एका तेलुगू दैनिकात पत्रकार म्हणून देखील काम केले होते. त्यांनी १९८३ मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयातून पूर्णवेळ वकिली करायला सुरुवात केली. केंद्रीय तसेच आंध्रप्रदेश प्रशासकीय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्यांनी दिवाणी, फौजदारी, घटनात्मक, कामगार, सेवा आणि निवडणुकीशी संबंधित खटल्यांमध्ये देखील विधिज्ञ म्हणून काम पाहिले होते. पुढे केंद्र सरकारसाठी त्यांनी अतिरिक्त स्थायी सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. ते हैदराबादेत काहीकाळ केंद्रीय प्रशासकीय लवादामध्ये भारतीय रेल्वेचे कायदा सल्लागार देखील होते. याचवेळी त्यांच्याकडे आंध्रप्रदेश सरकारची अतिरिक्त ॲडव्होकेट जनरल पदाची देखील जबाबदारी देण्यात आली होती. ते २००० मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात पूर्णवेळ न्यायाधीश बनले. पुढे त्यांची दिल्लीला मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाली आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्त करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात

रमणा हे १७ फेब्रुवारी २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. २७ फेब्रुवारी २०१९ पासून त्यांनी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले. यंदा ६ एप्रिल रोजी मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सरन्यायाधीशपदासाठी रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती.

महत्त्वाचे निवाडे

जम्मू- काश्‍मीरमधील इंटरनेटवरील बंदी उठविणे
सरन्यायाधीशांचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणणे
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात बहुमत चाचणीचे निर्देश
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT