Potato price fall  
देश

Potato price fall : बटाट्याच्या घसरलेल्या दराने शेतकरी बेहाल; पुढील हंगामातही...

Potatoes have given relief to common people: बटाट्याच्या भावात घसरण...

रवींद्र देशमुख

रोजच्या जेवणाच्या ताटीताल सर्वच पदार्थ महाग होत असताना बटाट्याने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. मात्र बटाटा उत्पादक शेतकरी बेहाल झाले आहेत. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचे साल नुकसान करणारे ठरले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे.

सध्या कोल्डस्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात बटाटा साठवण्यात आलेला आहे. त्यामुळे आगामी काळात देखील बटाट्याचे दर वाढण्याची शक्यता नाही. एवढा साठा आहे की, या हंगामात बटाटा संपविणे फार कठीण आहे.

बटाट्याचे सर्वात मोठे उत्पादक असलेल्या उत्तर प्रदेशातील आग्रा मंडईत सध्या बटाटे ८०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जात आहेत. कोल्ड स्टोअरमध्ये भरताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर होता. साठवणुकीचा एकूण खर्च २८० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यात शीतगृहाचे भाडे व इतर खर्चाचा समावेश आहे. सध्या उपलब्ध असलेला घाऊक भाव हा शेतकऱ्यांच्या एकूण खर्चाएवढा असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक बटुक नारायण मिश्रा यांनी सांगितले की, साठवणुकीदरम्यान काही बटाटे खराब होतात. शिवाय वजनही कमी होते. या अर्थाने नुकसान होत आहे. गेल्या वर्षी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता, मात्र सध्या कमाल दर ११०० रुपये प्रतिक्विंटल आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४०० रुपये कमी दर मिळत आहे.

पंजाबमधील बटाटा उत्पादक शेतकरी आणि कॉन्फेडरेशन ऑफ बटाटा सीड फार्मर्सचे सरचिटणीस जंगबहादूर सिंग म्हणाले की, यंदा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे पुढील काळात बटाट्याची लागवड कमी होऊ शकते.

देशात यंदा बटाट्याचे प्रचंड उत्पादन झाले आहे. २०२१-२२ मध्ये सुमारे ५३६ लाख टन बटाट्याचे उत्पादन झाले. २०२२-२३ मध्ये ती वाढून ५९० लाख टन होण्याचा अंदाज आहे. फेडरेशन ऑफ कोल्ड स्टोरेज असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेश गोयल यांनी सांगितले की, यंदा ९० ते ९५ टक्के शीतगृहे भरली आहेत. गेल्या वर्षी केवळ ८५ टक्के भरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT