देश

बदनामी करण्याचे उद्योग थांबवा;शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शहा यांची शिष्टाई अयशस्वी ठरल्यावर केंद्राने शेतकरी नेत्यांना जो लेखी प्रस्ताव पाठविला होता त्याच्या उत्तरादाखल शेतकऱ्यांनी, ‘शांततापूर्ण आंदोलनाची बदनामी करण्याचे उद्योग आधी थांबवा,’ असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. संयुक्त शेतकरी संघर्ष समितीच नेते दर्शन पाल यांनी हे लेखी उत्तर पाठविले आहे. सराकरचा प्रस्ताव साफ नामंजूर करतानाच, सरकारचा प्रस्ताव मिळाला त्याच दिवशी संघर्ष समितीने तो फेटाळल्याचे जाहीरपणे सांगितले होते. 

आम्ही याआधी तोंडी भूमिका वारंवार स्पष्ट केल्याने लेखी उत्तर देण्याची आवश्‍यकता भासली नाही. ५ डिसेबरला झालेल्या चर्चेत सरकारने जे तोंडी सांगितले तेच लेखी स्वरूपात दिले व शेतकऱ्यांनी तोंडी प्रस्तावही फेटाळला होता. सरकारने आंदोलनाची बदनामी व अन्य शएतकरी नेत्यांशी समांतर चर्चा करणे हे थांबवायला हवे अशी आमची इच्छा आहे, असे दर्शन पाल यांनी सांगितले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या माजी सैनिकांच्या सुमारे २०० जणांच्या जथ्याने आज गाझीपूर सीमेवर धडक दिली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

श्रध्दांजली दिन 
या आंदोलनात रोज सरासरी एका शेतकऱ्याचा मृत्यू होत आहे असे शेतकरी नेते ऋषिपाल यांनी सांगितले. आजपर्यंत २० शेतकऱ्यांचा थंडी व इतर कारणांनी मृत्यू झाला आहे. या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी २० डिसेंबरला श्रध्दांजली दिवस पाळण्यात येऊन एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. 

टेन्ट हाऊस आणि पिझ्झा लंगर ! 
दिल्लीसह एनसीआरमध्ये कालपासून थंडीचाही प्रकोप झाल्याने कडाक्‍याच्या थंडीपासून हजारो आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा बचाव व्हावा यादृष्टीने सिंघू सीमेवर एक विशेष तंबूघरही (टेन्ट हाऊस) तयार करण्यात आले आहे. येथील दिल्लीतील गुरूद्वारा समित्या व देणगीदरांच्या वतीने उभारलेल्या या टेंट हाऊससाठी एका पेट्रोल पंपची जागा घेण्यात आली आहे. या तंबूंमध्ये वातावरण उबदार रहाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर २४ तास सुरू असलेल्या लंगरसाठी एका तासात १०० ते १२०० चपात्या करणारी यंत्रे, वॉशिंग मशीन, गरम पाण्यासाठी सौर उर्जेची संयंत्रे, ट्रॅक्‍टरवर मोबाईल चार्जिंगची सुविधा व वाय फाय सुविधांनीही आंदोलनस्थळ सुसज्ज आहे. याच परिसरात नेहमीच्या लंगरबरोबरच पिझ्झा लंगरही सुरू करण्यात आले आहे. ज्या आंदोलकांना पिझ्झा खायचा असेल त्यांच्यासाठी येथे रोज हजारो पिझ्झाही तयार केले जातात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai jewellery Shop Robbery video : बुरखा घालून आले अन् बंदूक दाखवत भरदिवसा 'ज्वेलरी शॉप' लुटून निघूनही गेले!

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

Latest Marathi News Live Update : महापालिकेसाठी उमेदवार उद्यापासून सादर करणार अर्ज

SCROLL FOR NEXT