farmers movement delhi 
देश

‘दिल्ली’ला लंडनमधूनही पाठिंबा

पीटीआय

लंडन - भारत सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लंडनमधूनही पाठिंबा मिळाला आहे. लंडनमधील काही भारतीयांनी, विशेषत: शीख नागरिकांनी हजारोंच्या संख्येत एकत्र येत मोर्चा काढला. मात्र, यावेळी कोरोना नियम न पाळल्याने काही जणांना स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटकही केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शकांनी मोर्चा काढला होता. येथील प्रसिद्ध ट्रॅफलगार चौकातून निदर्शक फलक घेऊन जाताना दिसत होते. ‘आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत’ अशा घोषणा हे निदर्शक देत होते. या मोर्चावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन होत होते. मोर्चेकऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. ब्रिटिश पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही उल्लंघन होतच राहिल्याने किमान ३० जणांना अटक करून दंड ठोठावण्यात आला. ब्रिटिश प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही आंदोलकांशी चर्चा करू, असे भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच, लंडनमधील या आंदोलनामागे भारतविरोधी फुटीरतावाद्यांचा हात असल्याचा दावाही भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. हे भारतविरोधी घटकांनी आंदोलनाचे निमित्त करून आपला अजेंडा राबविण्यास सुरुवात केली आहे, भारतातील आंदोलन हा देशाचा अंतर्गत मामला असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT