Rahul Gandhi
Rahul Gandhi Team eSakal
देश

"आता बॅरिकेड्स हटवले, लवकरच तीनही कृषी कायदेही हटवले जातील"

सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू आहे. याठिकाणी दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना आडवण्यासाठी सिंघू दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी मोठे बॅरिकेड्स लावलेले होते. पोलिसांनी आता गाझीपूर सीमेवरील हे बॅरिकेड्स बाजूला हटवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना बाजूला हटवण्यासाठी पून्हा एकदा प्रयत्न केला जाऊ शकतो.

हरियाणाहून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या टीकरी बॉर्डरवर वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिसांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, हे बॅरिकेड्स हटवताच काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रया दिली आहे. आज बॅरिकेड हटवले उद्या तीन्ही कृषी कायदे हटवले जातील असं म्हणत राहूल गांधी यांनी पून्हा एकदा केंद् सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध केला. "अभी तो सिर्फ़ दिखावटी बैरिकेड हटे हैं, जल्द ही तीनों कृषि विरोधी क़ानून भी हटेंगे। अन्नदाता सत्याग्रह ज़िंदाबाद!" असं ट्विट राहूल गांधी यांनी यावेळी केलं.

दरम्यान, नोव्हेंबर २०२० पासून तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर नाकाबंदी वाढवण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईव्हीएम अन् ओटीपी... वायकर-किर्तीकर मतमोजणी प्रकरणात ECI अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Internet Problem : फोनमध्ये फुल नेटवर्क,पण इंटरनेट चालत नाहीये? पटकन वापरा 'या' ट्रिक्स

Sleepiness In Office : काम भरपूर आहे पण ऑफिसमध्ये सतत येतेय झोप, या छोट्या गोष्टींनी झोप उडेल आकाशी

Pankaja Munde: अन् पंकजा मुंडेंनी हंबरडा फोडला...लोकसभा पराभवामुळे जीवन संपवलेल्या युवकाच्या घरी कल्लोळ!

ZP Teacher Recruitment : चाळीसगाव तालुक्यात शिक्षकांची 38 पदे रिक्त; पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण

SCROLL FOR NEXT