6 February 
देश

Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम; आंदोलन होणार आणखी तीव्र

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोनहून अधिक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आपला निषेध तीव्र केला आहे. प्रजासत्ताक दिनाला काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर आता पुन्हा एकदा शेतकरी संघटना सरकारला धक्के द्यायला सज्ज झाली आहे. एकीकडे दिल्ली पोलिसांनी गाझीपूर आणि टिकरी बॉर्डरवरील जमीनीवर मोठमोठे खिळे लावून रस्ता बंद केला आहे. जेणेकरुन आंदोलनस्थळी जाणे-येणे आणि वाहतुक पूर्णपणे बंद व्हावी. या साऱ्याचा रोष व्यक्त करत कृषी कायदे रद्दबातल व्हावेत, म्हणून शेतकऱ्यांनी आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांकडून देशभर 'चक्का जाम' आंदोलन करण्यात येणार आहे. या चक्का जाममध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहतुक अडवण्यात येणार आहे. 

ही घोषणा करताना भारतीय किसान युनियनचे बलबीर सिंग राजेवाल यांनी म्हटलं की, सरकार आम्हाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलन स्थळाभोवतीचे रस्ते ब्लॉक करणे, आंदोलन भागातील इंटरनेट सेवा बंद करणे, तसेच पाण्याची आणि वीजेची सेवा बंद करणे, यासारख्या गोष्टी सरकारकडून करण्यात येत आहेत. 

पुढे त्यांनी म्हटलं की, सरकारकडून इतर राज्यातून दिल्लीकडे येणाऱ्या ट्रेन्स देखील वळवण्यात  आल्या आहेत, जेणेकरुन इतर राज्यातील शेतकरी आंदोलनस्थळी पोहचू नयेत. जे या आंदोलनाला समर्थन करताहेत, त्या लोकांना, पत्रकारांना अटक केली जात आहे. म्हणूनच आम्ही येत्या 6 फेब्रुवारीला आम्ही तीन तासांसाठी हायवेवर चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी काही ठोस तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

क्रांतीकारी किसान युनियन, पंजाबचे प्रमुख दर्शन पाल यांनी म्हटलं की, दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेड संदर्भात 122 लोकांना अटक केली आहे. यासाठी एक स्थापन करण्यात आली असून ती या लोकांची तुरुंगात भेट घेऊन कायदेशीर मदत देण्याविषयी काम करत आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, शेकडो शेतकरी आंदोलन स्थळी येऊ इच्छित आहेत, मात्र त्यांना अडवण्यासाठी सरकारकडून फिरोझपूर-मुंबई पंजाब मेल ही रेवारीकडे वळवण्यात आली आहे. तसेच आणखी दोन ट्रेन्स रोहतकवरच थांबवण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

T20 WC, IND vs PAK: '२४ तास थांबा, त्यानंतर...', सूर्यकुमार यादव पाकिस्तानसोबत हँडशेक करण्याबाबत काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT