Delhi  Team eSakal
देश

दिल्लीच्या सीमांवरील बॅरिकेड्स हटवले; पोलिसांनी सांगितले कारण...

Farmers Protest: पोलिसांनी आज सिंघू, टीकरी आणि गाझीपूर सीमांवरील बॅरिकेड्स हटवायला सुरुवात केली.

सुधीर काकडे

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेगवेळ्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिल्लीकडे येणाऱ्या या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी असणारे हे बॅरिकेड्स आणि काटेरी तारा काढायला सुरूवात केली आहे. पोलिसांनी हे बॅरिकेड्स काढल्याने वेगवेळ्या शक्यता वर्तवल्या जात असतानाच आता पोलिसांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या आंदोलन स्थळी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे स्थानिक लोकांच्या आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. "शेतकरी नेते, उत्तर प्रदेश आणि हरियाणा पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर, सीमेवरी बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, एक सकारात्मक संदेश देणं हीच यामागची भूमिका असल्याचं दिल्ली पोलिसांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टाने सुनावणीत शेतकरी संघटनांनी शहराच्या सीमेवर नाकाबंदीसाठी पोलिस जबाबदार असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांकडून हे बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. भारतीय किसान युनियन (BKU) च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी नाही तर पोलिसांनी रस्ते अडवले होते. हजारो शेतकरी 26 नोव्हेंबर 2020 पासून केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी टिकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांवर तळ ठोकून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

IND vs AUS 1st ODI Live: १० मिनिटांच्या पावासनं १ षटक कमी झालं... आता तर एक तास झाला पाऊस पडतोय; जाणून घ्या किती षटकांची मॅच होणार

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

गैरकारभाराविरोधात दिव्यांगांचा लढा! सहकार खात्यातील न्यायासाठी ६ वर्षांपासून संघर्ष

SCROLL FOR NEXT