delhi border main.jpg 
देश

Farmers Protest: यूपीच्या शेतकऱ्यांचे आंदोलन मागे; दिल्ली-नोएडा सीमा खुली

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याविरोधात सुरु असलेले उत्तर प्रदेशच्या (यूपी) शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आले आहे. यूपीचे शेतकरी नोएडातील सेक्टर 14 ए चिल्ला बॉर्डर हटले आहेत. त्यामुळे आता नोएडा ते दिल्ली वाहतूक सुरु झाली आहे. नागरिकांना होणारा त्रास पाहता सीमेवरुन हटण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आणि सरकार यांच्यात कृषी आयोग स्थापन करण्यावर सहमती झाली आहे. 

रविवारी सकाळी 12 वाजता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु झाली. सेक्टर 14 ए वर भारतीय किसान यूनियनचे (भानू गट) पदाधिकारी अंतिम निर्णय घेतली. पुढील निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत होईल. सेक्टर 14 ए चिल्ला सीमेवर दिल्लीच्या भागातील आरएएफ, आरपीएफ हटवण्यात आले आहे. दिल्लीतील फेज 1चे एसएचओ विवेक आणि एसीपी सचिन सिंघल हेही आपल्या पथकासह तेथून निघून गेले आहेत. आता ही सीमा पूर्णपणे खुली झाली आहे. ही सीमा 12 दिवस बंद होती. 

रात्री उशिरा शेतकरी संघटनेचे पदादिकारी दिल्लीत जाऊन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर हेही या बैठकीत सहभाग झाले होते. दोन्ही पक्षांच्या चर्चेनंतर ही सीमा उघडण्यात आली. या बैठकीत 18 मागण्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये किमान आधारभूत किंमतीचा उल्लेख नाही. परंतु, याशिवाय इतर शेतकरी संघटना आपल्या मागणीवर अडून बसले आहेत. 

या समझोत्यानंतर शेतकरी संघटना भारतीय किसान यूनियनने (भानू गट) धरणे आंदोलन सुरु ठेवायचे किंवा नाही हा निर्णय रविवारी घेणार असल्याचे सांगितले. या निर्णयानंतर 12 दिवसांपासून बंद असलेला महामार्ग सुरु झाला. याशिवाय इतर शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. रविवारी त्यांनी दिल्ली मार्च सुरु केला असून 14 डिसेंबर रोजी उपोषण केले जाणार आहे. आज सकाळी राजस्थानमधील शाहजहांपूर येथून शेतकऱ्यांनी जयपूर-दिल्ली महामार्गावरुन 'दिल्ली मार्च' सुरु केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT