Farmers Protest Team eSakal
देश

Farmers Protest: 29 नोव्हेंबरला शेतकरी संसदेकडे कूच करणार

दिल्लीमध्ये 29 तारखेपासून संसदेच्या हिवाळी आधिवेशनाला सुरूवात होणार आहे.

सुधीर काकडे

केंद्र सरकाच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. आज सोनीपतच्या कुंडली सीमेवरील संयुक्त किसान मोर्चाच्या कार्यालयात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्ताने झालेल्या या बैठकीत आंदोलनाच्या नव्या रणनीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सभेत चांगलाच गदारोळ झाला आणि सभेदरम्यान गुरनाम चदुनी आणि राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी बाहेर गोंधळ घातला.

दिल्लीत 29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबरपासून संसदेचे हे अधिवेशन संपेपर्यंत 500 निवडक शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून दररोज शांततेत आणि पूर्ण शिस्तीने संसदेत जातील असा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच सरकारने सीमा उघडण्यात आल्या असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार ज्या सीमा उघडण्यात आल्या आहेत, तिथून 500-500 शेतकरी ट्रॅक्टर घेऊन संसदेकडे जाणार आहेत.

संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी या बैठकीनंतर सांगितले की, शेतकरी 26 नोव्हेंबरला सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहकांत आंदोलन करणार आहेत. 26 नोव्हेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमधून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे कुच करणार असल्याचं देखील शेतकी संघटनांकडून सांगण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

Latest Marathi News Live Update : अनुदानित खतांची विक्री आजपासून बंद

Jalgaon farmer: बापाची हृदयद्रावक धडपड! शेती वाचवण्यासाठी दोन मुलांना औताला जुंपून पाडल्या सरी, जळगाव जिल्ह्यात कुटुंबाची पोटासाठी धडपड..

Mahua Barfi : घरच्या घरी कशी बनवायची हमीरपूर स्टाईल 'महुआ बर्फी'? पाहा साहित्य आणि बनवण्याची संपूर्ण सोपी विधी!

El Nino 2026 : चिंता वाढली! प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय; पावसावर आणि शेतीवर होणार मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT