Farooq Abdullah  Sakal
देश

Money Laundering : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांविरोधात आरोपपत्र दाखल

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या निधीच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Farooq Abdullah Money Laundering Case : मनी लाँड्रिंग प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या निधीच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी 84 वर्षीय फारुख अब्दुल्ला यांची ईडीने 31 मे रोजी श्रीनगरमध्ये तीन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली होती.

फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली असून, पीएमएलए कोर्टाने सर्व आरोपींना पीएमएलएच्या विशेष कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. सर्व आरोपींना 27 ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे.

हे प्रकरण J&K क्रिकेट असोसिएशनचे पैसे JKCA च्या पदाधिकाऱ्यांसह असंबंधित पक्षांच्या विविध वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करणे आणि JKCA बँक खात्यांमधून रोख पैसे काढण्याशी संबंधित आहे. आतापर्यंत या प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांची 21.50 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने यापूर्वीच जप्त केली आहे. सीबीआयने 11.07.2018 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे ईडीने JKCA च्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT