Haryana crime news esakal
देश

फतेहाबादमध्ये हॉटेलवर छापा; वेश्या व्यवसाय करणाऱ्या 5 जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

बैजलपूर रोडवरील हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

फतेहाबाद : फतेहाबादमधील (Haryana) भुना येथील बैजलपुरात एका खासगी हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी एका तरुणीसह दोन तरुणांना अटक केलीय. हॉटेलच्या काउंटरवर बसलेल्या अन्य दोन तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी (Police) अनैतिक व्यापार कायदा 1956 च्या कलम 3,4,5,6,7 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पोलिसांनी आपल्याच कर्मचाऱ्याला हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून पाठवलं होतं. अटक करण्यात आलेले तरुण हे गुराना आणि नाधोरी गावातील आहेत, तर तरुणीला गुरुग्राम येथून बोलावण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, बैजलपूर (Baijalpur) रोडवरील हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हेडकॉन्स्टेबल संदीपला 500 रुपयांची नोट देऊन साध्या वेशात हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं. यानंतर इशारा मिळताच भुना पोलिस ठाण्याच्या व्यवस्थापकानं त्यांच्या पथकासह घटनास्थळी छापा टाकला. घटनास्थळावरुन हॉटेलचालक सोनूला अटक करुन त्याच्याकडून 2500 रुपयांची रोकड जप्त केलीय.

अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी एकानं आपलं नाव सुरेंद्र रा. गुराना, तर दुसऱ्याचं नाव विष्णू रा. नाधोडी असं सांगितलं. तर, तरुणीनं स्वतःची ओळख अंजली असल्याचं सांगितलंय, ती गुरुग्रामची रहिवासी आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली असता मुलीनं सांगितलं की, ती इथं वेश्या व्यवसाय करण्यासाठी आली होती आणि हॉटेल चालक सोनूच्या सांगण्यावरूनच इथं पोहोचली. या पाच जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केलाय. डीएसपी अजायब सिंह म्हणाले, छापा टाकून गुरुग्राममधील एका तरुणीसह चार तरुणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT