Father Kills Self and Four Daughters In Delhi 
देश

Father Kills Self and Four Daughters : वडिलांनी पोटच्या 4 मुलींसह संपवलं जीवन! हृदय पिळवटून टाकणारं कारण आलं समोर

Father Kills Self and Four Daughters : एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह टोकाचे पाऊल उचलत आपले जीवनं संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रोहित कणसे

दिल्लीच्या रंगपुरी भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या चार मुलींसह टोकाचे पाऊल उचलत आपले जीवनं संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या चारही मुली अपंग होत्या असे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सर्वांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. ५० वर्षीय हीरालाल याचे कुटुंब रंगपुरी गावात भाड्याच्या घरात राहात होते, जे मूळ बिहारचे रहिवासी होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हीरालाल सुतारकाम करत असे आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू एक वर्षभरापूर्वी कँसरने झाला होता. त्यानंतर कुटुंबात १८ वर्षीय मुलगी नीतू, १५ वर्षाची निशी, १० वर्षीय नीरू आणि ८ वर्षांची मुलगी निधी या होत्या. दरम्यान

मुली अपंग असल्याने चालू फिरू शकत नव्हत्या त्यामुळे हीरालाल यांना अडचणींचा समाना करावा लागत होता. तसेच पत्नीच्या मृत्यूनंतर तो कायम निराश राहात असे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये व्यक्ती २४ तारखेला घरात जाताना दिसत आहे. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद झाला होता. चार मुलींपैकी एकीला दिसत नव्हतं दुसरीला चालता येत नव्हते तर बाकीच्या मुलींबद्दल पोलिस माहिती घेत आहेत. तसेच घरातून सल्फास पाऊच सापडले आहेत.

पत्नीच्या मृत्यूनंतर हीरालाल चांगलाच कोसळला होता. तो सकाळी कामावर जाण्याआधी मुलींची व्यवस्था लावून जात असे आणि संध्याकाळी आल्यावर देखील त्याला त्यांची काळजी घ्यावी लागत असे. घर चालवण्यासाठी कामधंदा खरणे आणि दुसरीकडे मुलींची काळजी घेणे यामध्ये तो निराशेत गेला. अखेर त्याने स्वतःचे आणि मुलींचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशीच तुझं जाणं वेदनादायक; लाडक्या भावाला अखेरचा निरोप, रुपाली चाकणकरांवर शोककळा

Latest Marathi News Updates : इलेक्शन कमिशन स्वतः मूर्ख आहे! प्रकाश आंबेडकरांची आगपाखड

Cyber Fraud : नाशिकमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा नवा फतवा, तिघांना १ कोटी रुपयांचा गंडा

Youth Protest: अतिक्रमण हटविण्यासाठी तरुणाचे टॉवरवर आंदोलन

Dharani Rescue : धरालीत बचावकार्य युद्धपातळीवर; आठवडाभरात एक हजारहून अधिक जणांना सुरक्षित बाहेर काढले

SCROLL FOR NEXT