father harrasehment sons girlfriend at tamilnadu 
देश

मुलाच्या प्रेयसीवर गेली बापाची वाईट नजर अन्...

वृत्तसंस्था

नागपट्टीनम (तामिळनाडू): मुलाच्या प्रेयसीवर बापाची वाईट नजर गेली आणि बलात्कार केल्यानंतर तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी नित्यानंदम (वय 42) याला अटक केली आहे. वेदारनयम येथे घडलेल्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

नित्यानंदम हा सेम्बोडाई येथे कपड्यांचे दुकान चालवतो. त्याला मदत केल्याप्रकरणी अन्य दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यानंदनचा मुलगा आयआयटीचे शिक्षण घेत होता. यावेळी चेन्नई येथील एका युवतीसोबत (वय 20) त्याची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नित्यानंदमला आपल्या मुलाच्या प्रेमसंबंधांबाबत समजले. दोघांना एकमेकांपासून वेगळे करण्याचा त्यान कट रचला. युवतीशी संपर्क करून तुझ्या आणि माझ्या मुलाच्या लग्नाबाबत तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून सेम्बोडाई येथे बोलवून घेतले. युवती सेम्बोडाई येथे आल्यावर नित्यानंदमने तिचा मोबाईल हिसकाऊन घेतला आणि बलात्कार केला. बलात्कारानंमतर त्याने तिच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसूत्र अडकवण्याचा प्रयत्न केला. बलात्कारानंतर पीडित युवतीला घेऊन मित्र सकथिवेल याच्या अवुरिकाडू येथील घरी गेला. तेथे दोन दिवस युवतीला बंद करून ठेवले.

दरम्यान, नित्यानंदमच्या मुलगा एन मुकेश कन्नान याला या घटनेबाबत माहिती मिळाली. तो तत्काळ अवुरिकाडू येथे गेला आणि प्रेयसीची सूटका केली आणि पोलिसांकडे गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नित्यानंदम अटक केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : शिवनेरी किल्ल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल

Taliban New Law : खूप मारहाण करा, फक्त हाडे मोडू नका... तालिबानची नवीन कायद्याद्वारे महिलांवरील घरगुती हिंसाचाराला मान्यता

ST Bus Service Issue : ‘एसटी’ची सेवा समान, तरीही भाडे वेगळे; नव्या ‘लालपरी’ आणि ‘हिरकणी’ बससेवेबाबत प्रश्न

Solapur Shiv Janmotsav: शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्याने सोलापूर शिवमय! महिला अन्‌ तरुणी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत; हजारो शिवप्रेमींची हजेरी..

HSC Exam Copy Case : कॉपी प्रकरणांनी ओलांडली शंभरी; गैरप्रकारात सहभागी असणाऱ्या ३१ कर्मचाऱ्यांचे निलंबन

SCROLL FOR NEXT