Uttarkashi Tunnel Rescue 
देश

मोठा मुलगा मुंबईत पूल बांधकामात गेला धाकटा सिल्क्यारा बोगद्यात अडकला! दिव्यांग बाप काय करणार?

Sandip Kapde

Uttarkashi Tunnel Rescue: 12 नोव्हेंबरपासून उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. काल बचाव कार्यादरम्यान ऑगर मशीन बिघडले, त्यानंतर मलब्यात अडकलेल्या ऑगर मशीनचे काही भाग कापण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा मशीन एअरलिफ्ट करण्यात आले.

मात्र, त्याआधी आज सकाळपासून बचावाचा दुसरा पर्याय म्हणून उभ्या ड्रिलिंगचा वापर केला जात आहे, जेणेकरून अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढता येईल.

उभ्या ड्रिलिंगसाठी दोन स्थळ निच्छित करण्यात आली आहे. अनेक एजन्सी बचाव प्रयत्नांवर काम करत आहेत. नुकतेच भारतीय हवाई दलही त्यात सामील झाले आहे.

दरम्यान, उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांपैकी मनजीतच्या वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे.  "माझ्या मुलाने पुढे बोगद्यात काम करावे असे मला वाटत नाही," असे मनजीतच्या वडील चौधरी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय चौधरी यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. 22 वर्षीय मनजीत 12 नोव्हेंबरपासून सिल्क्यरा बोगद्यात अडकला आहे.

चौधरी म्हणाले, "मनजीतची आई, बहीण आणि स्थानिक लोक प्रार्थना करत आहेत की मंजीत सुखरूप बाहेर यावा आणि त्याने गावी परतावे. आम्ही शेती करू, पशुपालन करू किंवा घरीच एखादा छोटासा व्यवसाय करू." (Latest Marathi News)

चौधरी म्हणाले, "त्यांनी आपला मोठा मुलगा दीपू (22) याला मुंबईत पूल बांधकाम अपघातात आधीच गमावले आहे. मनजीत हा कुटुंबाचा एकमेव कमावता असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे."

चौधरी म्हणाले की, "आता वयाच्या 50 व्या वर्षी कोणतेही काम करु, पण त्यांचा मुलगा आता घरी असावा अशी त्यांची इच्छा आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT