fda 
देश

एफडीएने मासळीची वाहने सीमेवर रोखली

प्रशांत शेटये

मडगाव : इतर राज्यातून येणारी मासळीची वाहने आज पहाटे अडीचनंतर गोव्याच्या सीमेवर अन्न व औषध प्रशासने (एफडीए) अडवून परत पाठवली. तथापि, महाराष्ट्रातील मासळीची वाहने नेहमीप्रमाणे आल्याने गोव्याची मुख्य मासळी बाजारपेठ असलेल्या मडगावमध्ये आज सुमारे 40 टन मासळीची आवक झाली. 

व्यापार परवाना विना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर एफडीएने मासळीची विक्री व वितरण करण्यास बंदी घातली होती. पालिकेचा व्यापार परवाना मिळवून एफडीएला सादर करण्याची सूचना मासळी व्यवसायिकांना करण्यात आळी होती. या सूचनेचे पालन न केलेल्या मासळी व्यावसायिकांवर एफडीएने आज कारवाई करताना इतर राज्यातून येणारी मासळीची वाहने सीमेवर रोखली. 

पोळे - काणकोण येथील चेकनाक्यावर कर्नांटक, केरळमधून आलेली मासळीची वाहने पहाटे अडीचनंतर अडवण्यात आली. या चेकनाक्यावर अडीचच्या आधी पोचलेली काही वाहने मात्र मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात दाखल झाली. महाराष्ट्रातून मात्र मासळीची बरीच वाहने मार्केटात दाखल झाली, अशी माहिती एका घाऊक मासळी विक्रेत्याने दिली. 

लहान मोठी मिळून मासळीची सुमारे 50 वाहने आज मडगावच्या घाऊक मार्केटात आहेत. यात शुक्रवारी आलेल्या काही वाहनांचाही समावेश आहे, असे या मासळी विक्रेत्याने सांगितले. 

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटात स्थानिक मच्छीमारांकडून पुरवण्यात येणाऱ्या मासळीसह  महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तिमळनाडू, आंध्र प्रदेश, ओडीशा या राज्यातून मासळीची मोठ्या प्रमाणात आवक होते. सर्वाधिक आवक महाराष्ट्रातील वेंगुर्ला, रत्नागिरी, मालवण, अलिबाग, देवगड येथून होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT