देश

मी जिवंत परतू शकलो; मुख्यमंत्र्यांना आभारी आहे म्हणून सांगा; PM मोदींचा खोचक टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे पोहोचल्यावर या साऱ्या घटनाक्रमावर मोदी अधिकाऱ्यांना काय म्हणाले, याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

जेपी नड्डांची आगपाखड

दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनीही याबाबत आगपाखड केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, "मतदारांच्या हातून पराभवाच्या भीतीने, पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंजाबमधील पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमांना हाणून पाडण्यासाठी शक्य त्या सर्व संभाव्य युक्त्या वापरल्या."

सुरक्षेत कोणतीही त्रुटी नव्हती: पंजाबचे मुख्यमंत्री

दुसरीकडे पंजाब काँग्रेसने हे आरोप धुडकावून लावले आहेत. एका पंजाबी वाहिनीवरील टीव्ही मुलाखतीत या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी (Charanjit Channi ) यांनी म्हटलंय की, “सुरक्षेत कोणतीही चूक नव्हती. पंतप्रधान ज्या मार्गावरुन जाणार होते त्याबाबतच्या आराखड्याची योजना शेवटच्या क्षणी बनवण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने जायचे होते. त्यांच्या रॅलीच्या सुरक्षा व्यवस्थेवर मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो. रॅलीसाठी 70,000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या पण फक्त 700 लोक आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT