Microsoft New Feature 
देश

मायक्रोसॉफ्टकडून १५ हजार कोटींची गुंतवणूक; IT आणि औद्योगिक मंत्र्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : मायक्रोसॉफ्टकडून (Microsoft) देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर (Data center) हैदराबादमध्ये (Hyderabad) उभारण्यात येणार आहे. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून पुढील १५ वर्षांत १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक (Fifteen thousand crore investment) करण्यात येणार आहे. तेलंगणामध्ये करण्यात येणारी ही दुसरी सर्वात मोठी विदेशी थेट गुंतवणूक (FDI) ठरेल. यापूर्वी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने २.७७ अब्ज डॉलर्स गुंतवत मुंबईनंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची गुंतवणूक केल्याचे राज्याचे आयटी आणि औद्योगिक मंत्री के. टी. रामा राव (K. T Rama Rao) यांनी आज सांगितले.

सध्या देशात मुंबई, पुणे व चेन्नई या ठिकाणी कंपनीचे डेटा सेंटर कार्यरत आहेत. हैदराबादमधील नवीन डेटा सेंटरमुळे कंपनीच्या देशातील ग्राहकांना क्लाऊड सेवा देण्याची क्षमता विस्तारण्यास मदत होईल. डेटा सोल्यूशन्स, कृत्रिम बुद्‍धिमत्ता (एआय), प्रॉडक्टिव्हिटी टूल्स यासह उद्योग, कंपन्या, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स, शासकीय विभाग यांना अत्याधुनिक डेटा सुरक्षा मिळण्यास मदत होईल, असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्‍वरी यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरच्या माध्यमातून २०१६ ते २०२० दरम्यान अर्थव्यवस्थेत ९.५ अब्ज डॉलर्सचा महसूल जमा झाला असून १५ लाख रोजगारनिर्मिती झाल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांचे कोट्यवधी रुपये ‘सांडपाण्या’त; दर्जाहीन कामे, गळक्या वाहिन्यांमुळे मुळा-मुठा नदी बनली गटार

Thane Fire: ठाण्यात मध्यरात्री आगीचा थरार! एकामागोमाग २३ वाहनांनी घेतला पेट, परिसरात धुराचे मोठे लोट; Video Viral

Samruddhi Expressway: ट्रकला आग लागून चालकाचा जळून मृत्यू; पुलाखाली पडल्याने दुसऱ्याचा अंत

Latest Marathi News Live Update : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला, हा काळा दिवस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gokul Milk Union Election : सतेज पाटलांविरोधात, हसन मुश्रीफांनी कंबर कसली; ठरावधारक ऐन सणासुदीत सहलीवर; क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून जोरदार फिल्डींग

SCROLL FOR NEXT