Fight for the honor of Vande Mataram Fight for the honor of Vande Mataram
देश

‘वंदे मातरम’च्या सन्मानासाठी लढा; नेत्याकडून न्यायालयात याचिका दाखल

सकाळ डिजिटल टीम

‘जन गण मन...’ या राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम’ला (Vande Mataram) आदर द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल (files petition in court) करण्यात आली आहे. भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. स्वातंत्र्य चळवळीत हे गाणे खूप गायले गेले. शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज राष्ट्रगीतासोबत ‘वंदे मातरम’ वाजवण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. (Fight for the honor of Vande Mataram)

मद्रास न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने २४ जानेवारी १९५० रोजी दिलेल्या निकालाचे पालन करावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. ‘वंदे मातरम’ म्हणून देशाची अखंडता राखणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. याशिवाय ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम’चा समानतेने प्रचार करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे.

‘वंदे मातरम’मुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, संविधान रचणाऱ्यांनी त्याचा आदर करण्याचे आश्वासन दिले होते. ‘जन गण मन’ने एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून भावना व्यक्त केल्या आहेत, तर ‘वंदे मातर’म देशाच्या चारित्र्याबद्दल सांगतो. त्यामुळे दोघांना समान दर्जा मिळायला हवा, असेही याचिकेत म्हटले आहे.

आदर करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य

‘वंदे मातरम’ (Vande Mataram) गाण्यावर आक्षेप घेतात अशी अनेक परिस्थिती असल्याचे याचिकेत (files petition in court) म्हटले आहे. परंतु, ‘वंदे मातरम’ जेव्हा गायले जाते तेव्हा त्याचा आदर करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू असताना ‘वंदे मातरम’ हा संपूर्ण देशाचा विचार आणि ब्रीदवाक्य बनला. लोक ‘वंदे मातरम’ म्हणत मिरवणुका काढत असत, असेही याचिकेत सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT