Plane Crash Plane Crash
देश

लढाऊ विमान मिराज २००० दुर्घटनाग्रस्त; वैमानिक सुखरूप

सकाळ डिजिटल टीम

भिंड : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये एअरफोर्सचे लढाऊ विमान मिराज २००० दुर्घटनाग्रस्त झाले. ही घटना बागडी गावात घडली. गावकऱ्यांनी याचा व्हिडिओ तयार केला आहे. पायलटने विमानातून उडी मारून जीव वाचवला. फ्लाइट लेफ्टनंट अभिलाश हे विमान उडवत होते. अभिलाश जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिराज २००० या लडाऊ विमानाला आज सकाळी तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पायलटने विमानातून उडी मारल्याने जीव वाचला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अपघात घटताच माहिती ग्वाल्हेर येथील एअरबेसच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली होती.

लडाऊ विमान कोसळल्यानंतर जोरात आवाज झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली असता शेतात खोल खड्डा पडला होता. तसेच विमान पूर्णपणे जळाल्याचे दिसले. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली आहे. चौकशीनंतरच कारणे उघड होतील.

गावकऱ्यांनी बनवला व्हिडिओ

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी गावकऱ्यांनी पॅराशूटवरून उतरणाऱ्या वैमानिकाचा व्हिडिओ बनवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT