jp nadda sakal
देश

काशी मथुरेचा चेंडू न्यायालयात !

घटनेनुसार निर्णय होईल- नड्डा

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - मजबूत राष्ट्र, एक राष्ट्र, हाच भाजपचा कायमस्वरूपी सिध्दांत आहे. काशी विश्वनाथ व मथुरेतील कृष्ण जन्मभूमीबाबत राज्यघटना व न्यायालये अंतिम निर्णय करतील. सारी वस्तुस्थिती व परिस्थिती स्पष्ट आहे अशा शब्दांत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या प्रकारचे वाद न्यायालयांच्या माध्यमातून सोडवण्याची संघाची भूमिकाच अधोरेखित केली. रामजन्मभूमीप्रमाणेच यापुढेही न्यायालयांचा निर्देश भाजप पालन करेल, असेही सूचक विधान त्यांनी केले.

मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नड्डा यांनी पक्ष मुख्यालय वार्तालाप केला. केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, धर्मेद्र प्रधान व अनुराग ठाकुर हजर होते. नड्डा म्हणाले की भाजपने कायम सांस्कृतिक विकासावर भर दिला आहे. भारताच्या संस्कृतीला धक्का न लावता विकास करण्याचे पक्षाचे धोरण आहे. सांस्कृतीक मुद्यांवर न्यायालयांच्या व राज्यघटनेच्या माध्यमातूनच निर्णय केले जातात व प्रत्येक भारतीय नागरिकावर ते बंधनकारक असतात. भाजपच्या पालमपूर कार्यकारिणीत रामजन्मभूमीबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता मात्र त्यानंतर काशी-मथुरेबाबत भाजपने असा ठराव मंजूर केलेला नाही. उत्तराखंडमध्ये समान नागरिक संहितेबाबत राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. सर्व नागरिकांना समान न्याय देणे व कोणाचे लांगूलचालन न करणे, भाजपचा हाच त्यामागील सिध्दांत आहे.

भाजप देशातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्यास तयार आहे असे सांगून नड्डा म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखाली गेली ८ वर्षे एक मजबूत देशाची निर्मिती यावरच काम सुरू आहे. मोदी सरकारच्या काळात एक मोठा समाज स्वतःला एकाकी अनुभवत असल्याचा आरोप फेटाळताना ते म्हणाले की सर्वांसाठी विकासाचे मापदंड एकच व एकच न्याय असणे यावर भाजपचा विश्वास आहे. आगामी १० दिवसांत भाजप कार्यकर्ते गरीब कल्याण, सुशासन या सिध्दांतावरील मोदी सरकारच्या यशस्वी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकांमध्ये ७५ तास घालवतील असेही नड्डा म्हणाले.

घोष-तोंड बंद ठेवा !

पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाने ‘प्रसार माध्यमांसमोर तोंड बंद ठेवा‘ असा निर्वाणीचा आदेश दिला आहे. नड्डा यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी घोष यांना लिहीलेल्या पत्रात हा कठोर शब्दांतील आदेश देण्यात आला आहे. (पत्राची प्रत सकाळ कडे आहे.) आपल्याला असे पत्र अद्याप मिळालेले नाही व पत्र मिळाल्यावर आपण उत्तर देऊ असे घोष यांनी म्हटले आहे. घोष यांच्या वक्तव्यांमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असे फीडबॅक आले त्यानंतर मागील संसद अधिवेशना दरम्यान त्यांना तोंडी कानपिचक्या देण्यात आल्या. पण त्यानंतरही त्यांनी, ‘भाजपला बहुमत मिळते तर मीच मुख्यमंत्री झालो असतो,‘ यासारखी विधाने करणे सुरू ठेवले होते. ज्येष्ठ पक्षनेते तथागत राय यांच्याशी त्यांचा जाहीर वाद झाला होता. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्याबाबतची त्यांची टिप्पणी पक्षनेतृत्वाला बिलकूल आवडलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT