Murder  Sakal
देश

धक्कादायक! हफ्ता वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला चिरडलं

सकाळ डिजिटल टीम

रांची : झारखंड येथे हफ्ता वसुलीसाठी आलेल्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याच्या गरोदर मुलीला ट्रॅक्टरखाली चिरडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्याच्या गरोदर मुलीचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेने खळबळ पसरली आहे. तसेच सदर कर्मचाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील बळीयानाथ येथील एका शेतकऱ्याने हफ्त्यावर ट्रॅक्टर घेतले होते. ट्रॅक्टरचे हफ्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीचा एक कर्मचारी वसुलीसाठी आला होता पण शेतकऱ्याकडे देण्यासाठी पैसे नसल्याने कर्मचारी ट्रॅक्टर घेऊन जात होता. त्यानंतर शेतकऱ्याच्या गरोदर मुलीने ट्रॅक्टर वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण कर्मचाऱ्याने मुलीला क्रूरपणे चिरडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

निखिलेश मेहता असं या शेतकऱ्याचं नाव असून ट्रॅक्टरचा एक लाखाचा हफ्ता थकल्यामुळे कर्मचारी वसुलीसाठी गेले असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोहसिन नक्वी सुधर, नाहीतर...! Asia Cup Trophy वरून बीसीसीआय आक्रमक; पाकिस्तानी नेत्याला दिला इशारा...

धक्कादायक! पहिली पत्नी असतानाही केवळ हुंड्यासाठी केला दुसरा विवाह, १५ लाख रुपये घेतले अन् आठ दिवसांत...

Mumbai News: ‘कूपर’मध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय!

Quick Commerce: आता किराणासारख्याच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूही १० मिनिटांत घरी पोहोचणार, टाटा आणि अंबानी नवा अध्याय सुरू करणार

Recharge Offers : दिवसाला फक्त 5 रुपयांत वर्षभराचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉल, रोज 2GB डेटा, SMS अन् बरंच काही..बड्या कंपनीने आणली ऑफर

SCROLL FOR NEXT