Sasikala 
देश

तमिळनाडू: शशीकला यांच्याविरोधात FIR; माजी मंत्र्याला धमकवण्याचा आरोप

विनायक होगाडे

चेन्नई: तमिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षाच्या माजी नेत्या व्ही के शशीकला यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहेत. तमिळनाडूचे माजी मंत्री सी व्ही शानमुगम यांनी शशिकला आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, सोशल मीडिया आणि मोबाईल फोनच्या माध्यमातून शशीकला यांचे समर्थक त्यांना धमकी देत आहेत.

अलिकेडच अण्णा द्रमुक पक्षाच्या माजी हंगामी महासचिव व्ही. के शशीकला यांनी एका ऑडीयो क्लिपच्या माध्यमातून संकेत दिले होते की त्या लवकरच पक्षात पुन्हा आगमन करणार आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. तर दुसरीकडे अण्णा द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते के पलानीस्वामी यांनी म्हटलंय की, व्ही. के. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबियांसंबंधी पक्षाची भुमिका स्पष्ट आहे. त्यांच्यासाठी पक्षामध्ये कोणतंही स्थान नाहीये.

कोण आहेत शशीकला?

कधीकाळी तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर कुणाचं नाव घेतलं जायचं तर ते होतं शशीकला यांचंच! मुख्यमंत्री पदावर जयललिता होत्या... मात्र पडद्याच्या मागे त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे आणि हालचालीमागे शशीकला यांचा सल्ला असायचा, असं म्हटलं जायचं. त्या यावर्षीच जानेवारी महिन्यात तुरुंगातून सुटून आल्या आहेत. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांना कोर्टाने 4 वर्षांची जेल सुनावली होती. त्यांच्या या सुटकेनंतर येऊ घातेलल्या तमिळनाडूच्या राजकारणात काय घडेल, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या निवृत्तीची ही घोषणा झाली आहे. या शशीकला काही सामान्य कार्यकर्त्या नव्हत्या. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना आश्चर्यकारक आहेत. 90 च्या दशकात त्या जयललितांना भेटल्या. त्यानंतर त्यांच्यात दिवसेंदिवस घट्ट मैत्री बनत गेली.. इतकी दृढ मैत्री की जयललितांनंत त्यांचंच नाव घेतलं जायचं. 1984 साली शशीकला एक व्हिडीओ पार्लर चालवायच्या. त्यांचे पती नटराजन जनसंपर्क अधिकारी होते. शशीकला यांना जयललिता यांच्या मींटिंगमध्ये व्हिडीओग्राफी करण्याची संधी मिळाली आणि तिथेच या दोघींचीही एकमेकांशी भेट झाली. या एका साध्या भेटीने पुढे तमिळनाडूचं राजकारण ढवळून काढलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT