Padma Awardee Physical Abused Minor Girl Sakal
देश

पद्म पुरस्कार विजेत्याचा दत्तक मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : एका पद्म पुरस्कार विजेत्याने दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची (Padma Awardee Physical Abused Minor Girl) घटना समोर आली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना आसाममध्ये घडली आहे. पीडित मुलीवर वर्षभरापासून बलात्कार केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर आसाम पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपीने गुवाहाटी उच्च न्यायालयात धाव घेतली. २८ डिसेंबरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. पण, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे, असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आरोपीच्या प्रतिष्ठेला मलिन करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आरोपीने याचिकेत केला आहे. तसेच बाल कल्याण समितीविरोधात देखील याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आहे. तसेच एपआयआरमध्ये पीडितेचे कोणतेही विशेष वक्तव्य नाही. त्यामुळे न्याय हितासाठी अंतरिम आदेश दिले जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं. तसेच याचिकाकर्त्याला ७ दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत.

आरोपी पोलिसांसमोर हजर झाला होता. त्यानंतर त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर जास्त भाष्य करता येणार नाही, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.

काय आहेत आरोप? -

तक्रारीनुसार, १ वर्षानंतर अर्जाचं नुतनीकरण करण्याच्या अटीवर पीडितेला आरोपीला दत्तक देण्यात आले होते. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बालकल्याण समितीनं वारंवार पत्र पाठवून देखील आरोपीनं अर्जाचं नुतनीकरण केले नाही. तसेच बालकल्याण समितीकडे मुलीला सोपवलं नाही. यंदा २८ ऑक्टोबरला पीडितेला बालकल्याण समितीसमोर आणले होते. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे आढळून आले. ज्या व्यक्तीला दत्तक दिलं होतं त्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

बालगृहातील एका अल्पवयीन मुलीला या व्यक्तीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. याच वर्षभरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित, इतर साक्षीदार आणि बालकल्याण समितीच्या विधानानुसार प्राथमिक निष्कर्षाच्या आधारे पीडितेला दत्तक घेतले तेव्हापासून तिच्यावर एक वर्ष बलात्कार केला गेला. वैद्यकीय चाचणीवरून देखील आरोप खरे असल्याचं प्रथदर्शनी दिसतं, असं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव बिचित्रा दत्ता म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT