देश

तालिबानची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत, मुनव्वर राणांविरोधात गुन्हा

नामदेव कुंभार

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर मांडलेल्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. राणा यांनी तालिबानची तुलना महर्षी वाल्मिकी ऋषींसोबत केली होती. यावर वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी मुनव्वर राणा यांच्याविरोधात जळगाव, लखनऊमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

लखनऊमधील हजरतगंज कोतवाली पोलिस स्थानकात मुनव्वर राणा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. वाल्मिकी समाजाचे नेता पीएल भारती यांनी तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस आधिकारी श्याम शुक्ला यांनी सांगितले की, पीएल भारती यांनी आपल्या तक्रारीत मुनव्वर राणा यांनी तालिबान्यांची तुलना वाल्मिकी ऋषींसोबत केली आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच त्यांचा आपमान झाला आहे.

जळगावमध्येही गुन्हा-

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा (Munavvar Rana) यांनी एका मुलाखतीत आफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) होत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले होते. त्यामध्ये त्यांनी बोलताना महर्षी वाल्मिक ऋषीं यांचा अनुल्लेख केला होता. त्याप्रकरणी राणा यांच्या विरोधात जळगावमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे (BJP) नगरसेवक कैलास सोनवणे यांनी ही तक्रार दिली आहे. त्यानुसार शनी पेठ पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम २९८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका मांडताना मुनव्वर राणा यांनी व्यक्त केलेल्या मतावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तालिबान्यांनी गेली २० वर्ष अन्याय सहन केला आहे. त्यामुळे आता सत्ता आल्यावर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तो साजरा केला, तर त्याच आपल्याला त्रास व्हायला नको, असेही राणा म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT