Rahul Gandhi News 
देश

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या विरोधात FIR, 2 वर्षांपर्यंत कारावास अन् दंडाची तरतूद, काय आहे आरोप?

Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढली.

Sandip Kapde

Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढली. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणात दोषीला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की, राहुल गांधी यांनी २०२१ मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

राहुल गांधी यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, राहुल गांधी यांनी ट्विट डिलीट केले आहे, ज्यामध्ये कथित बलात्कार आणि खून झालेल्या दलित मुलीची ओळख उघड झाली होती. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या वकिलाने पुष्टी केली की राहुल गांधी यांनी स्वतःच त्यांचे ट्विट हटवले आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रमुख प्रियांक कानूनगो (NCPCR chief Priyank Kanoongo) म्हणाले, "२०२१ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार-हत्या झाल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटले होते. यावेळी त्यांनी मुलीच्या पालकांसोबत व्हिडिओ शूट केले होते आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.  हे केल्यामुळे त्यांनी पॉक्सो कायदा आणि बाल न्याय कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले. "

"आम्ही दिल्ली पोलिसांना त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास सांगितले होते. आज या प्रकरणातील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली की त्यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. दिल्ली पोलिस लवकरच आरोपीला अटक करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे," असे प्रियांक कानूनगो म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझमध्ये अमेरिकेचा हल्ला, मालवाहू जहाजाला केलं लक्ष्य, पाच जणांचा मृत्यू; इराणी मीडियाचा मोठा दावा...

Petrol-Diesel Price: निवडणुकांचे निकाल लागले… आता LPG नंतर पेट्रोल-डिझेलही महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Tamil Nadu Election Result : तिरुपत्तूरमध्ये रंगला हायव्होल्टेज ड्रामा! फक्त 1 मताने ठरला आमदार; थलपती विजयच्या उमेदवारानं मंत्र्याचा पराभव करत रचला इतिहास

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्याच्या मध्यभागी ‘मृत्यूचे खांब’; हर्सूल-जटवाडा मार्गावर वाहनचालकांच्या जिवाशी खेळ

SCROLL FOR NEXT