fir registered against big boss winner elvish adav Noida police over 5 cobra snakes with poison rak94 SAKAL
देश

Elvish Yadav News : 'बिग बॉस' फेम एल्विश यादव गोत्यात! छाप्यात सापडले ५ कोब्रा अन् विष; पोलीसांनी दाखल केला FIR

नोएडा पोलिसांना सेक्टर ४९ मध्ये छापा टाकून पाच लोकांना अटक केली आहे.

रोहित कणसे

बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला असून एल्विश यादव याच्यावर तस्करी तसेच रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

नोएडा पोलिसांना सेक्टर ४९ मध्ये छापा टाकून पाच लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी येथून पाच कोब्रा साप देखील जप्त केले असून यासोबतच सापांचे विष देखील सापडले आहे. दरम्यान या कारवावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिग बॉस विजेता एल्विश यादव याचं नाव देखील समोर आलं आहेो. पोलिसांनी एल्विश यादव विरोधात एफआयआर दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका एनजीओने स्टिंग ऑपरेशन करत नोएडा पोलिसांकडे तक्रार केली होती.

एफआयआर कॉपी नुसार एल्विश यादव याच्या नावाचा आरोपींमध्ये समावेश आहे. ही एफआयआर पीपल फॉर अॅनिमल वेलफेयर ऑफिसर पदावर काम करत असलेल्या गौरव गुप्ता यांनी दाखल केली होती. गौरव गुप्ता यांना असे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. तसेच प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव नोएडा-एनसीआरच्या फार्महाऊसवर काही लोकांना भेटून सापाचे विष आणि जिवंत सापांसोबत व्हिडीओ शूट करत असल्याबद्दल माहिती मिळाली. तसेच रेव्ह पार्टीदेखील आयोजित केल्याची माहिती समोर आली होती. आज तकने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी केलेल्या छापेमारीत सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर आणि दोन तोंड असलेला एक साप, एक घोडा पछाड साप आढळला आहे. पोलिसांनी सांगितले की या छापेमारीत पाच आरोपींना अटक केली आहे. एल्विश यादवसह सहा जण आणि काही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एल्विश यादव याच्या सहभागाचा तपास केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT