Fire Sakal
देश

UP : आनंदाच्या क्षणी काळाचा घाला; लग्न घरी आगीचा भडक्यात पाच जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

लग्नघरी आगा लागून पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे अशी माहिती मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत ही भीषण आग लागली होती. त्यात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

आग लागलेल्या इमारतीत अमरुद्दीन त्यांच्या कुटुंबासमवेत तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. रात्री आठ वाजता अचानक घराच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. यामध्ये सासू समर जहाँ, सून शमा, मुलगी नाफिया, मुलगा इबाद यांचा मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर ही आग नेमकी कशी लागली याचा तपास अग्निशमन दलाकडून केला जात असून, लग्नघरी आनंदाच्या क्षणी अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

Maharashtra Politics: गणेश नाईकांचं 'ते' विधान अन् 14 गावांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

SCROLL FOR NEXT