Shatabdi Express 
देश

शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग; दिल्ली-डेहराडून दरम्यान घडली घटना

वृत्तसंस्था

डेहराडून : दिल्लीहून डेहराडूनला निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका वातानुकुलीत डब्याला अचानक आग लागली. ही घटना उत्तराखंडमधील कान्सरो भागात शनिवारी (ता.१३) घडली. शॉर्ट सर्किटमुळे सी-४ डब्याला आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. शताब्दी एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

रेल्वे डब्याला आग लागल्याचे समजताच इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली. तोपर्यंत आगीने पूर्ण डब्याला वेढले होते. डब्यातील ३५ प्रवासी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडले. प्रसंगावधान राखत आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

त्या डब्यातील प्रवाशांना सुरक्षितस्थळी नेईपर्यंत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं होतं. त्यानंतर गाडी डेहराडूनकडे रवाना झाली. आगीवर नियंत्रण आणण्यात आलं असून आसने पूर्णपणे जळून गेली असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दिल्लीहून डेहराडूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका डब्याला राजाजी टायगर रिझर्व्हच्या कान्सरो रेंज परिसरात आग लागली. भगवान बद्री विशाल आणि बाबा केदारनाथ यांच्या कृपेनं कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG PNG Rate Increase : सीएनजी’, ‘पीएनजी’च्या दरात वाढ; ‘सीएनजी’ प्रतिकिलो ९९ रुपये, तर......

Dimbhe Dam Water Release : चार महिन्यांची प्रतीक्षा संपली! डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून १५० क्युसेकने पाणी सोडले; आंबेगाव, शिरूरमधील ५० हून अधिक गावांना दिलासा

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

SCROLL FOR NEXT