INS Vikramaditya esakal
देश

INS Vikramaditya : नौदलाची विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्य जहाजाला लागली आग

नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाला आग लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू जहाजाला आग लागली आहे.

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) या विमानवाहू जहाजाला (Ship) बुधवारी आग लागली. यानंतर लगेचच तिथं उपस्थित असलेल्या टीमनं बचावकार्य सुरू केलं. त्यामुळं आग काही वेळातच आटोक्यात आली. सध्या या घटनेत कोणीही जखमी झालं नसून युद्धनौकाही पूर्णपणे सुरक्षित आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नौदलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना केलीय, जी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल.

नौदलाच्या प्रवक्त्यानं ट्विट केलं की, युद्धनौका कर्नाटकातील कारवार (Karnataka Karwar) येथून सागरी कारवाईसाठी निघालीय. दरम्यान, बुधवारी त्यात आग लागल्याची माहिती समोर आली. पथकानं घटनेनंतर लगेचच जहाजाच्या अग्निशमन यंत्रणेचा (Fire Brigade) वापर करून आग नियंत्रणात आणली. त्यामुळं तिथं उपस्थित असलेल्या एकाही नौसैनिकाला दुखापत झाली नाही. दुसऱ्या ट्विटमध्ये प्रवक्त्यानं लिहिलंय की, 'यासाठी चौकशी मंडळ स्थापन करण्यात आलं आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचं कारण समजू शकेल.'

याआधी 8 मे 2021 रोजी आयएनएस विक्रमादित्यवर अशीच घटना घडली होती. त्यावेळीही आग वेळीच आटोक्यात आणली गेली. INS विक्रमादित्य ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे, जी भारतानं रशियाकडून 14 हजार कोटींना खरेदी केली होती. हे 20 मजली जहाज 284 मीटर लांब आणि 60 मीटर उंच आहे. त्याचं वजन 40 हजार टनांपेक्षा जास्त आहे. एका वेळी सुमारे 1600 सैनिक त्यावर तैनात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT