Firing Firing
देश

मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेच्या तोंडावर गोळ्या झाडल्या

गोळी महिलेच्या डोळ्यात आणि कानाला लागली

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगड : कोरबा जिल्ह्यात नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी गुन्हेगारीची मोठी घटना घडली आहे. दिपका परिसरात महिलेच्या तोंडावर गोळ्या (firing) झाडून चोरट्यांनी पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला कोरबा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती चिंताजनक (Womans condition is critical) असल्याने पहाटे ४ वाजता रायपूर येथील रामकृष्ण केअर रुग्णालयात पाठवण्यात आले. सरोजिनीबाई (२५, रा. झाबर) असे जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सरोजिनीबाई हिच्या घरात दोन चोरटे घुसले. महिलेचा पती काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता. महिलेचे आई-वडील दुसऱ्या खोलीत होते. रात्री दोन तरुण घरात आले. एका तरुणाने गोळी झाडली, त्यानंतर दोघेही पळून (Accused absconded) गेले.

गोळ्यांचा आवाज ऐकून घरातील पालक महिलेच्या दिशेने धावले. गोळी महिलेच्या डोळ्यात आणि कानाला लागली. आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेला कोसा बारी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हल्लेखोरांना वेठीस धरण्यासाठी शहरात नाकाबंदी केली. मात्र, अद्यापपर्यंत कोणतेही यश आलेले नाही.

गोळीबाराची माहिती मिळताच टीआय अविनाश सिंह पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने शहरात नाकाबंदी लागू केली. घटनेची माहिती मिळताच एएसपी अभिषेक वर्मा यांनीही रात्री रुग्णालयात पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. घटनेमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी महिलेच्या पतीकडे काही वैमनस्य आदींबाबत चौकशी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या दिवशी PM मोदी आणि शहा आले, ४ मिनिटात कामकाज आटोपले; लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब

Shaktipeeth Highway Protest : जयंत पाटील, राजू शेट्टी एकत्र! 'शक्तिपीठ' रद्द करण्यासाठी सांगलीत मोठ्या आंदोलनाची घोषणा; 31 गावांतील 3 हजार एकरांहून अधिक जमीन बाधित

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

Independence Day 2026: तिरंगा थीमवर सजवा घर, शाळा अन् ऑफिस! १५ ऑगस्टला नक्की ट्राय करा 'या' भन्नाट डेकोरेशन आयडियाज!

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

SCROLL FOR NEXT