Panipuri 
देश

वाह रे पाणीपुरीवाला! लेकीच्या वाढदिवशी १ लाख लोकांना खाऊ घातली मोफत पाणीपुरी

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या एका 30 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शहरातील नागरिकांना एक लाख एक हजार पाणीपुरी मोफत खाऊ घालून आनंद व्यक्त केला. (free Panipuri news in Marathi)

भोपाळच्या कोलार भागात गुप्ता पाणीपुरी भांडार या नावाने पाणीपुरी विकणाऱ्या आंचल गुप्ता यांनी वर्षभरापूर्वी आपली मुलगी 'अनोखी'च्या जन्मानिमित्त लोकांना ५० हजार पाणीपुरी मोफत खाऊ घातल्या होत्या.

बुधवारी, आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त, गुप्ता यांनी "बेटी है तो कल है" चा संदेश देऊन आनंद व्यक्त केला. तसेच दिवसभर लोकांना एक लाख पाणीपुरी मोफत खाऊ घातल्या. यासाठी त्यांनी कोलार परिसरातील बंजारी मैदानात ५० मीटर लांबीच्या तंबूत २१ स्टॉल्स लावले आणि २५ मुलांना रोजंदारीवर ठेवून लोकांना पाणीपुरी खावू घातली.

कार्यक्रमस्थळी 'बेटी वरदान है', 'बेटी बचाओ', 'बेटी पढाओ'चे बॅनर लावण्यात आले होते. तीन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाच्या मुलीचे वडील गुप्ता यांनी सांगितले की, ते पाणीपुरीची गाडी चालवून महिन्याला 15 ते 20 हजार रुपये कमावतात.

गुप्ता यांनी म्हटलं की, मुलीचा जन्म माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मला मुलगी हवी होती. दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला देवाने मला आशीर्वाद म्हणून मुलगी दिल्याचंही गुप्ता यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून गुप्ता यांची मुलगी 'अनोखी' हिला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, "सदैव आनंदी राहा." गुप्ता यांनी सांगितले की अनेक लोकांनी त्यांच्या मुलीला भेटवस्तू देखील दिल्या. या कार्यक्रमाला क्षेत्राचे आमदार रामेश्वर शर्मा यांनीही हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT