First Electric Train
First Electric Train esakal
देश

First Electric Train : चार लाकडी डबे घेऊन ५० मैल धावली भारतातील पहिली ‘झुकझुक विजेवरची रेल्वे’!

सकाळ डिजिटल टीम

‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी…’ हे बालगीत तूमच्या लहानपणीही होतं आणि तूमच्या मुलांच्या लहानणातही सोबत आहे. त्या गाण्यातील रेल्वे कोळशावरील म्हणजेच आगीवर धावणारी होती. जशी ती रेल्वे महत्वाची आहे तशीच विजेवर आलेली रेल्वेही महत्वाची आहे. विजेवरील रेल्वे आजच्याच दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी १९२५ मध्ये धावली होती.

आज भारतीय रेल्वेचा ९८ वा वाढदिवस आहे. आजकालच्या रेल्वेला १५ २० डबे असतात. पण, त्याकाळात केवळ ४ डबे घेऊन ही रेल्वे धावली होती. तिचा वेग काशी ५० मैल इतका होता. डबे हे लाकडी बनावटीचे होते. त्यात मध्ये लोखंडाचा देखील वापर करण्यात आला होता.

मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. त्यानंतरच्या काही काळातच मुंबईच्या ईशान्येला नासिक व अग्नेयेला पुण्यापर्यंत तेव्हाच्या जीआयपी रेल्वेने प्रचंड क्षमतेच्या विजेच्या तारा टाकल्या व विजेवर चालणाऱ्या रेल्वेचे जाळे पुणे व नशिकपर्यंत पोहोचले. ही खरीच क्रांती होती. कारण खंडाळ्याच्या व कसाऱ्याच्या घाटांत कोळशाच्या इंजिनाच्या रेल्वे गाड्या चालवणे कष्टांचे व धोकादायकही होते.

विजेवर चालणाऱ्या रेल्वेचा सर्वाधिक फायदा अर्थातच मुंबईकरांना झाला कारण यामुळेच मुंबईकरांची 'जीवनवाहिनी' ठरलेली उपनगरी रेल्वे सुरू झाली. आज या लोकल गाड्यांतून दररोज ४५ लाख मुंबईकर प्रवास करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT